रास्ता रोको प्रकरणी अतुल बेनके यांना अटक होणार?
घोडे पाटील यांच्या अनुपस्थितीत अजय गोरड पाहणार काम?
– रास्ता रोको प्रकरणी अतुल बेनके यांना अटक होणार?
नारायणगाव | वारूळवाडी आणि गुंजाळवाडी रस्त्याच्या कामा संदर्भात झालेल्या आंदोलनात ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. याच पार्श्वभूमीवर सध्या प्रशासकीय पातळीवर काही हालचाली होताना दिसत आहेत नारायणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील हे काही दिवस हे कामानिमित्त बाहेर गेले असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या अनुपस्थितीत याआधीचे अजय गोरड हे काम पाहणार आहेत अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या सर्व घटनांचा संदर्भ पाहता आंदोलक ग्रामस्थ, तसेच राष्ट्रवादीचे अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार नारायणगाव पोलीस स्टेशन चे घोडे पाटील हे कामानिमित्त बाहेर जात आहेत आणि त्यांच्या जागी बरोबर याच दरम्यान गोरड हे अतिरिक्त काम पाहणार हे नक्कीच शंका उपस्थित करणारं आहे. त्यामुळे याप्रकरणी राजकीय दबाव किंवा अन्य काही गोष्टींचा शिरकाव आहे का हे प्रश्नचिन्ह अधिक गडद होताना दिसत आहे. जर अतुल बेनके यांना अटक झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस ची पुढची भूमिका काय असणार आहे किंवा या घटनेवर आमदार शरद सोनवणे हे आता काय भूमिका उचलतात हेही पाहणं महत्वाचे ठरेल.
त्यामुळे रास्ता रोको प्रकरण आता नवीन वळण घेते की काय अशी चर्चा जुन्नर तालुक्याच्या राजकिय वर्तुळात रंगताना दिसत आहे.
Leave a Reply