राष्ट्रवादी युवक च्या पदांवर राष्ट्रवादीकडून सामान्य घरातील युवकांना संधी
सजग वेब टिम, मुंबई
मुंबई | लोकसभा निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच पक्षामध्ये नेमणुका केल्या आहेत. राष्ट्रवादीने युवक राष्ट्रवादी संघटनेच्या पदांवर सामान्य घरातील तरुणांना संधी दिली आहे.
मेहबूब शेख यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे, तर सुरज चव्हाण आणि रविकांत वर्पे यांची युवक राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी देणार असल्याचं अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यानुसार सामान्य घरातील चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरु आहे.
Leave a Reply