राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित
सजग वेब टीम
राष्ट्रवादी काँग्रेस कडून अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित
मुंबई | शिवसेनेला जय महाराष्ट्र करत प्रसिद्ध अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार छगन भुजबळ, आमदार अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर, नवाब मलिक यांच्यासह पक्षातील अनेक नेते उपस्थित होते.
या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेची उमेदवारी हि डॉ. अमोल कोल्हे यांनाच देण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. याच पार्श्वभूमीवर येत्या ५ मार्च पासून डॉ. अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघाच्या संपर्क दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ते सभा घेणार आहेत व या सभांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी आपल्याला ठिकाणच्या होणाऱ्या सभेची जबाबदारी घेतली असल्याची माहिती मिळत आहे.
या सर्व घटना पाहता डॉ.कोल्हे यांच्या उमेदवारी संदर्भात पक्षाकडून अधिकृत घोषणा व्हायची फक्त बाकी आहे असच म्हणावे लागेल.
Leave a Reply