‘रायगड’ नव्हे तर लोकसभेची एकही जागा नको : जयंत पाटील

पुणे : ‘रायगड लोकसभा मतदारसंघावर शेकापचा दावा नाही. ती जागा आम्ही काँगेस- राष्ट्रवादीला आघाडीला सोडली आहे. समविचारी पक्ष येऊन भाजपचा पराभव करणं हेच आमचं ध्येय आहे’, असे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले,’शेतकरी कामगार पक्षाने लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला लोकसभेची जागा नको. आम्ही आघाडीकडून जो उमेदवार देईल त्याला साथ देणार आहोत. विधानसभेला मात्र काही जागावर आमचा दावा आहे. नक्की कोणत्या जागा लढवणार याबाबत चर्चा सुरु आहे. त्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादीकडून आमचा मान राखला जाईल, अशी अपेक्षा आहे.समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat