राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय
मुंबई | आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
ते खालीलप्रमाणे…
१. दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय.
२. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी १०० कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करण्यास मंजुरी.
३. मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास मान्यता.
४. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मान्यता.
Leave a Reply