राजे ग्रुप व गौतमभाऊ औटी मित्र परिवाराच्या वतीने वैद्यकीय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
राजे ग्रुप व गौतमभाऊ औटी मित्र परिवाराच्या वतीने वैद्यकीय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव
नारायणगाव | नारायणगाव शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गावातील राजे ग्रुप व गौतमभाऊ औटी मित्र परिवाराच्या वतीने मास्क, सॅनिटाईझर व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेले काही दिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वसामान्य व गरीब कुटुंबांना मदत म्हणून तसेच माझ्या माणसांसाठी माझी जबाबदारी या हेतू ने औटी मळा ,दरंदाळे मळा, खेबडे मळा, गाढवे मळा या ठिकाणी सॅनिटाईझर व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर कोविड योद्धा म्हणून काम पार पाडत असणारे ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांच्या जीवाची काळजी करतात त्यामुळे त्यांचा देखील उचित सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी अमित बोरचटे, ओंकार तांबे, वैभव तांबे, अनिकेत औटी, तेजस परदेशी, संदेश औटी, प्रवीण औटी, अमित कांबळे, प्रदीप ढोरसकर राहुल डेरे ,हर्शल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply