रस्त्यांची निकृष्ठ कामे आणि पाणी प्रश्नावरून आदिवासी जनतेची फसवणूक : अजिंक्य घोलप

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | जुन्नरच्या पश्चिम भागातील जुन्नर ते नाणेघाट रस्त्याचे काम युवकांच्या आंदोलनानंतर सुरु झाले. रस्त्याचे काम सुरु असताना एका येणेरे गावच्या एका युवकास जीवही गमवावा लागला आहे. परंतु त्याची दखल ना प्रशासनाने घेतली ना लोकप्रतिनिधींनी. दुसऱ्या टप्याचे काम सध्या सुरु आहे,ते देखील निकृष्ठ दर्जाचे आहे अशी ग्रामस्थांची तक्रार आहे, आणि त्याचे पुरावे देखील ठेकेदार यांना दाखवले असुन काम अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने याभागातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काम चांगले आणि त्वरित पुर्ण करावे अशी सर्वांची मागणी आहे. अशी माहिती अजिंक्य घोलप यांनी सजग टाईम्स शी बोलताना दिली आहे.

माणिकडोह धरणाच्या कुकडी किनारा भागातील शेतकऱ्यांची व्यथा पहिली तर पहिले आवर्तन ५५%चे झाल्यानंतर आता फक्त पिण्यासाठी पाणी पुरेल इतका साठा शिल्लक असताना वारंवार पाणी सोडले जात आहे. अजूनही जवळपास ४ ते ५ महिन्याचा काळ लोटायचा असूूून पाणी पुरले नाहीतर लोकांना संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे. पाणी सोडताना योग्य नियोजन झाले नसल्याने लोकांमधे तीव्र नाराजी असल्याचे अजिंक्य घोलप म्हणाले. पाण्याच्या मागणीचे फॉर्म भरण्याचे आवाहन आमदार सोनवणे यांनी केले असले तरी यावर्षी येणाऱ्या संकटांना मात्र सर्वांना सामोरे जावं लागणार असल्याचे चित्र आहे.

प्रश्न रस्त्याचा असो अथवा पाण्याचा कुठलेही राजकारण न करता समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असेही घोलप यावेळी म्हणाले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat