यंदाची शिवजयंती विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | १९ फेब्रुवारी ला साजरी होत असलेल्या शासकीय शिवजयंती सोहळ्याला यंदा मात्र वादांची किनार आहे. शिवजयंतीच्या गडावरील कार्यक्रमानंतर होणारी सभेचे ठिकाण हे यंदा जुन्नर येथे नाही तर ओझर याठिकाणी हलविण्यात आले आहे. त्याच कारण म्हणजे जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेले विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम. या कार्यक्रमांमुळे यंदा शासकीय शिवजयंती उत्सव सभा हि ओझर याठिकाणी होत आहे.
हि सभा सालाबादप्रमाणे जुन्नर येथेच व्हावी, अनेक वर्षांच्या परंपरेला मोडीत काढत सभेचे ठिकाण बदलने उचित नाही अशा पद्धतीचा सूर काढत काही सामाजिक संघटनांनी याबाबत निवेदनेही दिली आहेत.

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणारा शिवनेरभूषण पुरस्कार यंदा जवळपास ३१ मान्यवरांना देण्यात येणार आहे यामध्ये काही दिवंगत व्यक्तींचाही समावेश आहे. एवढे पुरस्कार एकाचवेळी देण्याचे कारणही उमगत नसले तरी स्थानिक लोकप्रतिनिधींचा यामागे काही राजकिय फायदा घेण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
यावेळी शिवनेरभूषण पुरस्कारही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने तालुक्यात होत असलेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांच्या फ्लेक्सबाजी वरून ही नवीन वाद निर्माण झालाय. या फ्लेक्सवर शिवसेना भाजप संबंधित नेत्यांचे फोटो असून राज ठाकरे यांचा मात्र फोटो नाहीये यावरून मनसैनिकांनी शरद सोनवणे यांच्यावर त्यांच्या फेसबुकवर तुफान टीका केली आहे. या मुद्द्यावरून सोनवणे यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

या सर्व कारणांमुळे यंदाची शिवजयंती हि भलतीच वादातीत ठरत आहे असं म्हणावं लागेल. या वादांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस या कार्यक्रमांना उपस्थित राहतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat