मुस्लिम समाजाच्या विकास कामांसाठी कटिबद्ध – दिलीप वळसे पाटील

सजग वेब टिम,जुन्नर

जुन्नर | शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदारांनी मोठा विश्वास राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षावर दाखवून उमेदवार डाॅ.अमोल कोल्हे यांना विजयी केले आहे.या पुढील काळात सच्चर आयोगाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून मुस्लीम समाजाच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.
कादरीया वेलफेअर सोसायटी जुन्नर आणि जुन्नर तालुका मुस्लिम समाज यांच्यावतीने आयोजित केलेल्या रोजा ईफ्तार कार्यक्रमात श्री.वळसे पाटील प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

यावेळी जुन्नर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने नवनिर्वाचित खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.अशी माहीती निमंत्रक अब्दूल रऊफ खान व सादिक आतार यांनी दिली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काॅन्ग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, जि.प.गटनेत्या आशाताई बुचके,विघ्नहर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर,जि.प.पुणेचे माजी अध्यक्ष गणपतराव फुलवडे,पांडूरंग पवार, शरद लेंडे,उज्वला शेवाळे,हाजरा ईनामदार हाजी रज्जाक कुरेशी,ज्येष्ठ नेते बशीरभाई तिरंदाज,नगरसेवक रऊफखान पठाण,मुन्ना सय्यद, राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे तालुका अध्यक्ष अकबरखान पठाण, राजू ईनामदार,सईद पटेल,मुबीन शेख,अकबर बेग,आजीम तिरंदाज, सादिक आतार,मुबारक तांबोळी,दादाभाई पटेल,जुबेर ईनामदार,सिद्दीक ईनामदार, फकीर आतार,अन्वर सय्यद,एजाज चौधरी कादरीया सोसायटीचे सर्व सदस्य,तालुक्यातील मुस्लीम कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना खासदार डाॅ.अमोल कोल्हे म्हलाले की हा विजय फक्त माझा एकट्याचा नसून तो सर्व सामान्य जनतेचा विजय आहे.समाजाच्या विकास कामासाठी सदैव तत्पर राहील,असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी अतुल बेनके,आशाताई बुचके,गणपतराव फुलवडे,सत्यशील शेरकर यांचीही भाषणे झाली.
उपस्थितांचे स्वागत कादरीया वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल रऊफ खान यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजू ईनामदार व सईद पटेल यांनी केले.उपस्थितांचे आभार नगरसेवक रऊफ पठाण यांनी मानले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat