मुस्लिम बांधवांची ईश्वरनिष्ठा उल्लेखनीय- आमदार शरद सोनवणे
सजग वेब टिम, जुन्नर
आळेफाटा | प्रचंड जीवघेणा उन्हाळा,अतिउच्च तापमान असताना देखील दृढ ईश्वरनिष्ठा ठेवून माझा मुस्लिम बांधव रमजानचे उपवास करतो आहे.निष्चितच त्यांची ही ईश्वरनिष्ठा उल्लेखनीय आहे असे मनोगत जुन्नर तालूक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी व्यक्त केले.
गरीब नवाज मस्जिद ट्रस्ट आळेफाटा व पोलीस स्टेशन आळेफाटा यांच्या वतीने आयोजित केलेल्या रोजा ईफ्तार कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काॅन्ग्रेसचे युवा नेते अमित बेनके,जि.प.सदस्य शरद लेंडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर,नेताजी डोके,रघूनाथ लेंडे, धनंजय काळे, मोहन भुजबळ,अॅड.दत्ता भागवत,दिलीप वाव्हळ, प्रितम काळे,पोपट हुळवळे,शेखर कु-हाडे,सागर भटकळ, शरद वामन, बुवाफिटर इत्यादी मान्यवर व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
यावेळी अमित बेनके , जि.प.सदस्य शरद लेंडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर,माजी उपसरपंच धनंजय काळे,अॅड.दत्ता भागवत,जाकीर पटेल यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्य निमंत्रक सादिक आतार,विश्वस्त मुजाहीद शेख,अन्वर मणियार,राजूभाई जमादार,रशीद आतार, आसिफ मणियार,अन्सार शेख,खालीद बेपारी,मणियार सर,कमालखान यांनी केले.
प्रास्तविक मेहबूब काझी यांनी ,स्वागत व सत्कार सादिक आतार व मुजाहीद शेख यांनी केले.सुत्रसंचालन अकबरखान पठाण यांनी केले.
Leave a Reply