मुख्यमंत्र्यांची रायगडावर अनौपचारिक भेट; सुरु असलेल्या कामांची पाहणी

मुख्यमंत्र्यांची आज रायगडवर अनौपचारीक भेट आणि गडावर सुरु असलेल्या कामाची पाहणी

सजग वेब टिम

रायगड | आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली. सुरुवातीला पाचाड मध्ये जाऊन जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने सुरु असलेल्या विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

रायगड किल्ल्यावर ऐतिहासिक वास्तूंचे होत असलेले जतन आणि संवर्धन नेमकं कश्या प्रकारे केलं जातं हे त्यांनी समजून घेतलं. चित्त दरवाजा येथे सुरु असलेल्या पायऱ्यांची कामे , रोपवे पासून नगारखान्यापर्यंत जवळपास पूर्ण होत आलेल्या फरसबंदीची कामे, तसेच त्याला लागूनच करण्यात आलेले उत्खनन त्यांनी पाहीले. राजसदरेवर महाराजांचे दर्शन घेऊन संपूर्ण गडावर सुरु असलेल्या कामांचं प्राधिकरणाच्या वतीने तयार केलेलं सादरीकरण पाहिलं.

रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या राजमुद्रेची प्रतिकृती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचं मी कौतुक करतो , की आपण आज अगदी शिवभक्तासारखी भेट दिलीत. रायगडाच्या आजच्या भेटीला कुठल्याही प्रकारचं राजकीय स्वरूप न देता , कसल्याही प्रकारच्या प्रसिद्धीची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे इथे होत असलेली कामे पाहिली , समजून घेतलीत त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो”.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर खा. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले काम पाहून मी थक्क झालो. महाराष्ट्रात आजपर्यंत कोणत्याही किल्ल्यावर इतक्या शास्त्रोक्तपध्दतीने काम झालेले नाही. संभाजीराजेंनी रायगडसाठी कोणत्याही प्रकारची मागणी करावी त्यांची पुर्तता करण्याची जबाबदारी शासनाच्या वतीने माझी राहील हा माझा शब्द आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat