मीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

मीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कालवा समितीत प्रत्येक गावचा एक प्रतिनिधी असावा – अमित बेनके

सजग वेब टीम

नारायणगाव | येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर पाणी पुरवठ्यासाठी मीना वर अवलंबून असणाऱ्या 12 गावच्या शेतकऱ्यांनी आज (30 जानेवारी 2019) मोर्चा काढला होता.या वेळी शाखा अभियंता मांडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वडज,पिंपळगाव,कुरण,वडगाव सहानी, सावरगाव, बस्ती,खिलारवाडी,धोंडकरवाडी, विठ्ठलवाडी,निमदरी,निमगाव म्हाळुंगे, या गावचे शेतकरी व ग्रामस्थ तसेच अमित बेनके व जिल्हा प. सदस्य गुलाब पारखे उपसस्थित होते.
मागील आवर्तन शेतकऱ्यांना कल्पना न देता सुरू केल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी केला,तसेच या वेळी नियोजनापेक्षा अधिक पाणी सोडले गेल्याने प्रतिनिधी व अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला.तर पाणी सोडणार असल्याचे जाहीर प्रकटन करण्यात आले होते असे अधिकरी म्हणाले ,मात्र तसा ग्रामपंचायतीपर्यंत कुठलाही कागद अथवा पत्र आले नसल्याचे ग्रामपंचायत प्रतिनिधींनी सांगितले.अचानक सोडलेल्या पाण्यामूळे आमच्या मोटारी वाहून गेल्या तर विहिरीत काम सुरू असताना अचानक आलेल्या पाण्यामुळे विहिरीत कामगार अडकल्याचेही काही शतकर्यांनी सांगितले.
मागील अवर्तनाला मोठा काळ उलटून गेला असल्याने मीना पत्राच्या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा,तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.पिकाला शेवटचे पाणी द्यायचे आहे परंतु पाणी नसल्याने हाता तोंडाशी आलेले पीक जळून जाण्याची भीती या वेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आर्वी गावाच्या वरील भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाल्याने आता जर आवर्तन सोडले नाही तर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला.
धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पर्यंत पाणी उपसा करण्यास परवानगी आहे मात्र खालचा शेतकरी पाण्यावाचून मरतो आहे.मग हा भेदभाव कशासाठी? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
पाणी सोडण्याचा अधिकार कालवा समितीला आहे.तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पाण्याचे नियोजन करण्यात येत असते.सदर निवेदन हे अधीक्षक अभियंत्याला पाठवणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील पाठपुरावा केला जाईल असे शाखा अभियंता मांडे म्हणाले.
तर “आम्हाला ठोस निर्णय हवा,पत्र पोहचवायची कामे करू नका,तसेच कलवा समितीमध्ये प्रत्येक गावच्या प्रतिनिधींचा समावेश करा” असे अमित बेनके म्हणाले.
पाठबंधारे विभागाने पिण्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी विनंती जी.प सदस्य गुलाब पारखे यांनी अधिकाऱ्यांना केली,तसेच पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्यात येईल अशी शाश्वती त्यांनी दिली.
गेल्या आठवड्यात एक स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना ,तालुक्याला पाणी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार शरद दादा सोनवणे यांनी दिली होती,मात्र शेतकऱ्यांना पाण्यासाठी आज रस्त्यावर उतरावे लागत आहे ही मोठी शोकांतिका असल्याचे शेतकरी समाज दर्पणशी बोलताना म्हणाले.

मीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नारायणगाव,ता.३०(प्रतिनिधी)
येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मीना कालव्यावर अवलंबून असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील १२ गावच्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. या वेळी शाखा अभियंता मांडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी वडज, पिंपळगाव, कुरण, वडगाव सहानी, सावरगाव, बस्ती, खिलारवाडी, धोंडकरवाडी, विठ्ठलवाडी, निमदरी, निमगाव म्हाळुंगे या गावचे शेतकरी व ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अमित बेनके व जि. प.स. गुलाब पारखे उपस्थित होते.

मागील आवर्तन शेतकऱ्यांना कल्पना न देता सुरू केल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी प्रशासनावर केला, तसेच या वेळी नियोजनापेक्षा अधिक पाणी सोडल्याने लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला. तर पाणी सोडणार असल्याचे जाहीर पत्रक काढण्यात आले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली ,मात्र तसा ग्रामपंचायतीपर्यंत कुठलाही कागद अथवा पत्र आले नसल्याचे ग्रामपंचायत प्रतिनिधींनी सांगितले. अचानक सोडलेल्या पाण्यामूळे आमच्या मोटारी वाहून गेल्या तर काही ठिकाणी विहिरीत काम सुरू असताना अचानक आलेल्या पाण्यामुळे विहिरीत कामगार अडकल्याचेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.

मागील आवर्तनाला मोठा काळ उलटून गेला असल्याने मीना नदी पात्राच्या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा, तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पिकाला शेवटचे पाणी द्यायचे आहे परंतु पाणी नसल्याने हाता तोंडाशी आलेले पीक जळून जाण्याची भीती या वेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

आर्वी गावाच्या वरील भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाल्याने आता जर आवर्तन सोडले नाही तर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला.

धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पर्यंत पाणी उपसा करण्यास परवानगी आहे मात्र खालचा शेतकरी पाण्यावाचून मरतो आहे. मग हा भेदभाव कशासाठी? असा सवालही शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.
पाणी सोडण्याचा अधिकार कालवा समितीला आहे. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पाण्याचे नियोजन करण्यात येत असते. सदर निवेदन हे अधीक्षक अभियंत्याला पाठवणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील पाठपुरावा केला जाईल असे शाखा अभियंता मांडे यांनी सांगितले.

तर “आम्हाला ठोस निर्णय हवा,पत्र पोहचवायची कामे करू नका,तसेच कालवा समितीमध्ये प्रत्येक गावच्या प्रतिनिधींचा समावेश करा” असे अमित बेनके म्हणाले.

पाठबंधारे विभागाने पिण्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी विनंती जी.प सदस्य गुलाब पारखे यांनी अधिकाऱ्यांना केली,तसेच पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्यात येईल अशी शाश्वतीही त्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना, तालुक्याला पाणी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार शरद सोनवणे यांनी दिली होती, मात्र शेतकऱ्यांना पाण्यासाठी आज रस्त्यावर उतरावे लागत आहे ही मोठी शोकांतिका असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून लवकरात लवकर यातून मार्ग काढावा अशी विनंती यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat