Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2762

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/output.class.php on line 3706

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 751

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 795

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 831

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 839

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 893

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 917

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 955
'मिनाई' पुनर्जीवित करण्याचा एकमुखी संकल्प करा. – डॉ.राजेंद्रसिंह राणा | Sajag Times

‘मिनाई’ पुनर्जीवित करण्याचा एकमुखी संकल्प करा. – डॉ.राजेंद्रसिंह राणा

नारायणगाव | आपण आपल्या आईचा, नदी मिनाईचा मृत्यू डोळ्याने पहिला आहे,तिच्या मृत्यूला आपणच सर्वस्वी कारणीभूत आहोत.
मिना नदीचे नैसर्गिक आणि पर्यावरणीय वैभव पुन्हा प्राप्त आणण्यासाठी आम्हांला मिनाईला पुनर्जीवित करावे लागेल त्यासाठी आपण सर्वांनी एकमुखी संकल्प करा असे मनोगत जगविख्यात जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी नारायणगाव याठिकाणी व्यक्त केले.
ग्रामपंचायत नारायणगाव/वारूळवाडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या “निर्मल मिनाई संकल्प” अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी श्री.राणा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे हे पर्यावरणप्रेमी युवक असून त्यांनी वृक्षलागवड,प्लास्टिक बंदी,पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प राबवून गावाला नवीन दिशा देण्याचे कार्य केले आहे.
अशा निसर्गप्रेमी सरपंचाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ.राणा यांनी केले.

मिना नदीच्या पुनर्जीवीकरण प्रकल्प राबविण्यासाठी पाच कलमी कार्यक्रम राबवून आपल्याला ठोस परिवर्तन घडवून आणावे लागेल.
सर्व नागरिक,परीसरातील शैक्षणिक,धार्मिक,सामाजिक संस्थांनी या उपक्रमात कृतीशील सहभाग घेणे आवश्यक आहे.
शासन स्तरावरील अधिकारी व संबंधित अधिकारी व संभधित विभागांनी सकरात्मक भूमिका ठेवून नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत नदी पुनर्जीवनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाजास दिशा द्यावी एकत्रित व सांघिक प्रयत्नाशिवाय हे कार्य शक्य नाही.
त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या पवित्र कार्यात सहभागी व्हा असेही डॉ.राणा यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी अतिरिक्त सचिव लिना मेहेंद्रळे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ,यशदाचे कार्यकारी संचालक सुमंत पांडे,कृषी विज्ञान केंद्रचे अध्यक्ष अनिलतात्या मेहेर,आमदार शरद सोनवणे,गटनेत्या आशाताई बुचके,तात्यासाहेब गुंजाळ,बाळासाहेब पाटे,स्वाती दीक्षित,विना पाटील,पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर,मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे डॉ.संदीप डोळे,डॉ.सदानंद राऊत, डॉ.आनंद कुलकर्णी,डॉ.अनिल शेवाळे,मा.उपसरपंच संतोष वाजगे,संतोषनाना खैरे,उपसरपंच मनीषा मेहेत्रे,वारूळवाडीचे उपसरपंच सचिन वारुळे,अरविंद ब्रमहें इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान मिना नदी स्वच्छतेसाठी श्री विरोबा पतसंस्थेच्या वतीने १ लाख रु.ची रक्कम देण्यात आली.
या अभियानाची सुरुवात जलदिंडीने करण्यात आली सकाळी ९ वाजता ग्रामदैवत हनुमान मंदिरामध्ये ब्रम्ह कुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख संगीता बहेनजी,ज्येष्ठ सामाजिक विचारवंत अरविंद ब्रमहें यांच्या हस्ते व डॉ.राजेंद्रसिंह राणा,सुभाष भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित झाले झाले.

जलदिंडीमध्ये गावातील नागरिक,शालेय विद्यार्थी,विविध सामाजिक संस्था यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या दिंडीचे स्वागत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात करण्यात आले.

ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा केंद्राचे उदघाटन डॉ.राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते करण्यात आले.
निर्मल मिनाई संकल्प अभियानासाठी डॉ.राणा यांच्या सूचनेनुसार लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली विविध स्थरातील प्रतिनिधी समितीची स्थापना करण्यात आली कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक जलदूतांनी उपस्थित राहुन या अभियानास सक्रिय सहभागाची तयारी दर्शवली.
यावेळी गटनेत्या आशाताई बुचके,कृषी केंद्राचे अनिलतात्या मेहेर,यशदाचे संचालक सुमंत पांडे,लीला मेहंदळे यांची भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच योगेश पाटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपसरपंच संतोष दांगट,आरिफ आतार,राजेश बाप्ते,गणेश पाटे,भाग्येश्वर डेरे,सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे,गटविकास अधिकारी विकास दांगट,आशिष माळवदकर,अजित वाजगे,दीपक वारुळे,जितेंद्र गुंजाळ,निलेश जाधव, जयेश कोकणे,अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी व मेहबूब काझी यांनी केले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat