मावळ पंचायत समितीच्या हंगामी सभापती पदी विवेक वळसे पाटील यांची निवड
प्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)
आंबेगाव | भाजपचे वर्चस्व असलेल्या मावळ पंचायत समितीच्या हंगामी सभापती पदी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची निवड झाली आहे मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हासळकर,व उपसभापती शांताराम कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेचे कामकाज पाहण्यासाठी वळसे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या अध्क्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 75 अन्वये जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती यांच्याकडून समितीच्या सभापती पदासाठी चिठ्ठी टाकून निवड करन्यात आली त्यात जिल्हा परिषदेचे सदस्य व अर्थ व शिक्षण खात्याचे सभापती विवेक वळसे पाटील यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची निवड करण्यात आली पुढील निवड होईपर्यंत वळसे हे सभापती म्हणून कामकाज पाहणार आहेत.
Leave a Reply