माजी विद्यार्थ्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल
माजी विद्यार्थ्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल
आजी – माजी विद्यार्थ्यांत संवाद आवश्यक ~ प्रा.अशफाक पटेल
सजग वेब टीम
नारायणगाव | येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य रा.प.सबनीस यांच्या प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने माजी विद्यार्थी, पालक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी माजी विद्यार्थ्यी प्रा.अशफाक पटेल, जयश्री बेनके, पुनम पाटे, तुषार कोर्हाळे, प्रियांका शिंदे, व पालकांनी सुधाकर सैद यांनी मनोगत व्यक्त करत या माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याचे कौतुक केले.
यावेळी बोलताना माजी विद्यार्थी प्रा.अशफाक पटेल म्हणाले की, माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी तसेच व्यावसाय करत अाहेत. त्यांचा अनुभव हा आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. जेणे करुन विद्यार्थी या मार्गदर्शन आणि प्रेरणेतुन आपलं भवितव्य घडवु शकतील. यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातुन आजी व माजी विद्यार्थ्यात संवाद होणे गरजेचे असुन त्यासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करावे माजी विद्यार्थी आपल्या सोबत असतील. तसेच लवकरच माजी विद्यार्थी संघामार्फेत सर्वांना एकत्र करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आश्वासनही पटेल यांनी दिले.
यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे संचालक डी.के.भुजबळ, सरपंच ज्योत्सना फुलसुंदर, प्राचार्य श्रीकांत शेवाळे, उपप्राचार्य होले सर यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्यावतीने नारायणगावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीवर निवड झालेले डाॅ.श्रीकांत फुलसुंदर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तेलंगणा आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झालेला माजी विद्यार्थी अमर चिखले अाणि राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल प्रा.अशफाक पटेल यांचा ग्रामोन्नती मंडळाचे संचालक डी.के.भुजबळ, प्राचार्य श्रीकांत शेवाळे, उपप्राचार्य होले सर व उपस्थित प्राध्यापकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे संचालक डी.के.भुजबळ, सरपंच ज्योत्सना फुलसुंदर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे, उपप्राचार्य होले सर, डाॅ.शिवाजी टाकळकर, डाॅ.श्रीकांत शेवाळे, प्रा.आकाश कांबळे, प्रा.अनुराधा घुमटकर, प्रा.काळभोर, डाॅ.विनोद पाटे, डाॅ.रसुल जमादार, डाॅ.समिर शेख यांसह माजी विद्यार्थी प्रा.अशफाक पटेल, प्रा.पुनम पाटे, तुषार कोर्हाडे, प्रियांका शिंदे, विनायक जाधव, दत्तात्रय भुजबळ, जयश्री बेनके यांसह माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डाॅ.शिवाजी टाकळकर यांनी केले. सुत्रसंचालन कुटे सर यानी तर आभार डाॅ.विनोद पाटे यांनी मानले.
Leave a Reply