मला दिलेले प्रेम कोल्हे यांना द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आमची – विलास लांडे
सजग वेब टीम, राजगुरूनगर
चाकण | शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित चाकण येथील सभेत ते बोलत होते. या सभेसाठी विलास लांडे आणि मंगलदास बांदल हे दोन्ही उमेदवारी न भेटल्याने नाराज नेते यावेळी उपस्थित होेते.
सभेत विलास लांडे यांचे भाषण सुरू असताना बांदल आले त्यावेळी लांडे म्हणाले की या बांदल बसा. आता आपल्याला बसायचे आहे. लांडे असे म्हणताच उपस्थित नागरिकांत एकच हशा पिकला.
यावेळी बोलताना विलास लांडे म्हणाले की, मोहिते पाटलांचे आणि आम्हा दोघांचे मनोमिलन झाले आहे. या निवडणुकीत साहेबांच्या विचारांना ताकद द्यायची आहे. ७१ हजार कोटींचे कर्ज माफ करणारा पहिला मंत्री म्हणजे पवार साहेब आहेत. १५ वर्षात काही काम नाही. विमानतळ नाही. रेल्वे नाही. सीएसआर निधी देखील स्वतःच्या शाळेसाठी नेला अशी टिका आढळराव पाटील यांच्यावर त्यांनी केली. मला दिलेले प्रेम कोल्हे यांना द्या, डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्याची आपली जबाबदारी आहे असे आवाहन लांडे यांनी यावेळी केले.
Leave a Reply