भारतीय डाक विभागामार्फत आधार कार्ड साठी आधार सप्ताहाचे आयोजन
भारतीय डाक विभागामार्फत आधार कार्ड साठी आधार सप्ताहचे आयोजन
दिनांक ८ ते १४ मार्च या कालावधीत आधार कार्ड दुरुस्ती / नवीन सप्ताहाचे आयोजन
सजग वेब टिम, पुणे
पुणे । भारतीय डाक विभाग, पुणे ग्रामीण डाक विभाग यांच्या वतीने आधार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार कार्ड काढण्यासाठी दिनांक ०८.०३.२०२० ते १४.०३.२०२० या काळात विशेष आधार सप्ताह चे आयोजन करण्यात अाल्याची माहिती शिवाजीनगर पुणे ग्रामीणचे डाकघर अधीक्षक बी.पी.एरंडे यांनी दिली.
त्यासाठी पुणे ग्रामीण विभागात बारामती, भोर, आळा ,आळंदी देवाची, भवानीनगर, चाकण, दौंड, देहू रोड कॅन्ट, डिंभे कॉलनी, घोडेगाव, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, कामशेत, केडगाव, खेडशिवापूर बाग, लोणावळा बझार, लोणावळा, लोणी काळभोर, मंचर, मांजरी फार्म, नारायणगाव, न्हावरा, निरा, ओतूर, पौड, फुरसुंगी, पिरंगुट राजेवाडी, सासवड, शिरूर, सोमेश्वरनगर, तळेगाव दाभाडे, तळेगाव ढमढेरे, उरुळी कांचन, वाघोली, वालचंदनगर या ठिकाणच्या पोस्ट ऑफिस मध्ये आधार दुरुस्ती व नवीन आधार कार्ड काढण्याचे काम केले जाणार आहे. तरी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डाकघर अधीक्षक बी.पी.एरंडे यांनी केले आहे.
Leave a Reply