भाडेकरुंचे एका महिन्याचे भाडे माफ करा आमदार महेश लांडगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद
आमदार महेश लांडगे यांच्या मदतीच्या आवाहनाला सुहास ताम्हाणे, पांडाभाऊ साने यांची साथ
सामाजिक जबाबदारीने भाडेकरुंचे एका महिन्याचे भाडे माफ
सजग वेब टिम, भोसरी
भोसरी । कोरोनाच्या आपत्ती जगभारात संकट ओढावले आहे. परिणामी, देशात लॉकडाउन झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक सर्वांनाच नोकरी, व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे अनेकांना घरभाडे, दुकानभाडे कसे भरावे? असा प्रश्न पडला आहे. यात अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत.
आमदार महेश लांडगे यांव्या मदतीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भोसरी परिसरातील सामाजिक कार्यकर्ता सुहास ताम्हाणे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या मालकीच्या सदनिका आणि दुकान गाळे भाडेकरुंकडून मार्च महिन्याचे भाडे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या श्रीकृष्ण सोसायटी , ताम्हाणेवस्ती, चिखली येथे ४५ सिंगल आणि १० डबल रुम आणि एका कोचिंग क्लासमधील भाडेकरुंना एक महिन्याचे( मार्च) भाडे माफ करण्याचा निर्णय घेत मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच युवा नेते पांडाभाऊ साने यांनीही सदनिका, गाळेधारकांकडुन एक महिन्याचे भाडे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत बोलताना सुहास ताम्हाणे म्हणाले की, देशावर राज्यावर मोठे संकट ओढावले आहे .त्यामुळे नागरिकांनी घरामध्ये राहुन आपले आरोग्य – आपले जीवन सांभाळणे हेच आद्यकर्तव्य झाले आहे. तसेच, यामुळे सगळ्यांनाच आपले नोकरी, छोटे-मोठे व्यवसाय बंद ठेवावे लागले आहेत. यामुळे सर्व कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. आमदार महेशदादा लांडगे यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला साद देत आम्ही सामाजिक बांधिलकीतून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.
तर पांडाभाऊ साने म्हणाले की, कोरोनाच्या आपत्तीमुळे जगभरात संकट ओढावले आहे. राज्यावर ओढवलेली आपत्कालीन परिस्थिती निवारण्यासाठी अनेक मातब्बर, दानशूर व्यक्ती व संस्था पुढे येत, जमेल तशी मदत करीत आहेत. परिणामी, देशात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वांनाच नोकरी, व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. प्रभाग क्रमांक १, चिखली-मोरेवस्तीमध्येही अशीच परिस्थिती आहे त्यामुळे आमदार महेशदादा लांडगे यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला साद देत, सामाजिक बांधीलकी जपत, मी माझ्या मालकीच्या सदनिका, दुकानदार व भाडेकरुंकडून मार्च महिन्याचे भाडे न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.
Leave a Reply