भाजपचे दोन विद्यमान सरपंच विवाह बंधनात अडकणार …१३ जानेवारीला #सरपंचविवाह सोहळा रंगणार ..

 

पुणे – सध्या लग्न सराई चे दिवस चालू आहेत सगळीकडे लग्नांची धूम पाहायला मिळतेय. पुणे जिल्ह्यात मात्र चर्चा आहे एका अनोख्या विवाह सोहळ्याची. असं काय आहे खास या विवाहासंबंधी जाणून घेऊयात. भाजप युवा मोर्चा चे पुणे जिल्हाध्यक्ष, हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गावचे विद्यमान सरपंच सुदर्शन चौधरी यांचा विवाह भाजप युवा मोर्चा च्या प्रदेश सचिव, खेड तालुक्यातील मेदनकरवाडी (चाकण) च्या सरपंच प्रियांका मेदनकर यांच्याशी येत्या १३ जानेवारीला होणार आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही विद्यमान सरपंच असल्याने या विवाह सोहळ्याची चर्चा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगलीये. दर रविवारी स्वच्छ भारत अभियान, गणेश फेस्टिव्हल, सीएम चषक सारख्या वेगवेगळ्या उपक्रमांनी आपल्या गावाला आणि पक्षाला वेगळी दिशा देणारे सुदर्शन चौधरी यांनी एक युवा सरपंच म्हणून वेगळी छाप पाडली आहे. तसेच त्यांच्या घरात सून म्हणून येणाऱ्या प्रियांका मेदनकर याही MIT School of Govt. मधून पदवीधर आहेत तसेच राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरातील आहेत आणि विद्यमान सरपंच असून त्याही भाजप च्याच पदाधिकारी आहेत. प्रियांका यांनीही मेदनकरवाडी येथे महिला आणि आरोग्य संदर्भात असेल किंवा एक रुपयात सॅनिटरी नॅपकिन वाटप, सरपंच आपल्या दारी हा उपक्रम, डिजिटल ग्रामपंचायत अशा विविध उपक्रमांमधून आपली छाप पाडली आहे. या दोघाही उभयतांचा सरपंच पदाचा कार्यकाळ हा २०२० पर्यंत आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat