बेल्हे परिसरात ऊसाला आगीचे सत्र; दिड एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी
सुधाकर सैद , बेल्हे (सजग वेब टीम)
बेल्हे | जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत असून असलेल्या जेमतेम पाण्यावर आपापली पिके जगविण्याची धडपड करत असून कल्याण-नगर महामार्गावरील गुंजाळवाडीच्या (बेल्हे ) शिवारात दत्तात्रय सखाराम गुंजाळ यांचा दिड एकर उस आगीच्या भक्षस्थानी पडला असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून अर्धवट ओढलेल्या विडी, सिगारेट किंवा आगपेटीच्या काडीमुळे लागलेल्या आगीमध्ये ऐन दुष्काळात जगविलेला व त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून काही आडाखे बांधलेले असतानाच दिड एकर उस जळून खाक झाला यावेळी वीजपुरवठा बंद असल्याने व जवळपास पाण्याची काहीही सोय नसल्याने आगीने रौद्र स्वरुप धारण केले व संपूर्ण उस आगीच्या भक्षस्थानी पडला,याचवेळी कारखान्याचे ऊसतोड कामगार ऊस तोडण्याचे करत होते, तसेच या आगीमुळे शेजारीच असणाऱ्या राजेंद्र गंगाधर गुंजाळ या शेतक-याच्या द्राक्ष बागेतील ५००झाडांना या आगीची झळ पोहोचली असून चालू हंगामासह नवीन झाडांच्या लागवडीसह जवळजवळ पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले,या आगीचे कारणही अज्ञात असल्याचे समजते.या अचानक लागलेल्या आगीचा पंचनामा बेल्हे महसूल कार्यालयाने केला.
Leave a Reply