बेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी
देवराम लांडे आणि बाबूभाऊ पाटे यांची उपस्थिती
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर -| २३ जुलै रोजी १४ नंबर याठिकाणी आयोजित केलेल्या अतुल बेनके यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात जुन्नर तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लावलेली हजेरी चर्चेचा मुद्दा ठरत आहे.
आदिवासी भागातील मारुती वायाळ, भाऊसाहेब देवाडे यांच्या सह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे आणि नारायणगाव चे सरपंच बाबूभाऊ पाटे यांनीही बेनके यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
विधानसभा तोंडावर आलेली असताना शिवसेनेत चाललेली धुसफूस हि अतुल बेनके यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.
आमचं ठरलंय, जुन्नर मध्ये बेनके पारनेर मध्ये लंके
पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके यांनीही अतुल बेनके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी
“आमचं ठरलंय, जुन्नर मध्ये बेनके पारनेर मध्ये लंके” असे वक्तव्य केले त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेली गर्दी हि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जमेची बाजू ठरत आहे.
Leave a Reply