बालचमूंंनी खाऊसाठी जमवलेले पैसे दिले ग्रामसुरक्षा निधीसाठी मदत
बालचमूंंनी खाऊसाठी जमलेले पैसे दिले नारायणगाव ग्रामसुरक्षा निधीसाठी
सिद्धेश व अर्जुन सचिन तांबे यांच्याकडुन ५,५५३ रुपये मदत
सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव | ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातुन कोरोना सुरक्षा व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी “नारायणगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसुरक्षा निधीला” मदत करण्याचे आवाहन लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी केले असुन या आवाहनाला नारायणगावसह परिसरातील नागरिक उत्स्फुर्त प्रतिसाद देत भरभरुन मदत करत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज सरपंच पाटे यांचे मित्र सचिन तांबे यांचे चिरंजीव सिद्धेश सचिन तांबे, अर्जुन सचिन तांबे यांनी सरपंच योगेश पाटे यांच्याकडे खाऊसाठी जमलेले पैसे जवळपास ५,५५३ रुपयांचा डबा ग्रामनिधीसाठी सुपुर्त केला. यानिमित्तानं सरपंच पाटे यांनी या बालचमूंंचे कौतुक करत त्यांना घरीच राहून काळजी घेण्यास सांगितले.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातुन लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांनी ग्रामपंचायत सोडियम हायपोक्लोराईड फवारणी, धुराची फवारणी, गोरगरीबांना जेवन, हातावर पोट असलेल्यांना अन्न धान्यांचा पुरवठा, मोफत आरोग्य तपासणी व अौषध पुरवठा यांसह विविध उपक्रम राबवत असुन कोरोना सुरक्षेच्या नारायणगाव पॅटर्नचे लोकप्रतिनिधींसह प्रशासासह कौतुक होत आहे. यासाठी दानशुर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन नारायणगाव ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, मुलांचे पालक सचिन तांबे, राजेश पाटे, अनिल खैरे, भागेश्वर डेरे, किरण ताजणे, अजित वाजगे, अजय पाटे, ईश्वर पाटे, जालू खैरे, निखिल सावंत, तेजस पाटे उपस्थित होते.
Leave a Reply