“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड
मॉरिशस येथे होणार “फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलन
सजग वेब टिम, महाराष्ट्र
नाशिक|महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांपासून ठिकठिकाणी संपन्न झालेल्या फुले, शाहू, आंबेडकर
साहित्य संमेलनाची दखल मॉरिशस येथील मराठी संघाने घेतली आहे. येत्या ऑगष्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर संमेलन मॉरिशस येथे होणार आहे.
सदर संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी आबासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ. रोहिदास जाधव यांनी ही माहिती दिली.
आबासाहेब थोरात हे गेल्या अनेक वर्षापासून पुरोगामी परिवर्तन जळजळीत कार्यरत
असुन व्यवसायाने ISO मानांकन क्षेत्रात ते प्रसिद्ध उद्योजक म्हणून नावाजलेले आहेत. यासंबंधीत देशभर त्यांचे काम चालत असते. महत्त्वाचे म्हणजे सदर संमेलन प्रसंगी प्रथमच एका तरुण आणि धडाडीच्या कार्यकर्त्याची निवड झाली आहे. असे संयोजकांनी सांगितले आहे.
दि. १ ते ५ ऑगष्ट २०१९ दरम्यान हे फुले, शाहू, आंबेडकर साहित्य संमेलन होत असून संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक डॉ. मनोहर जाधव आणि उद्घाटक म्हूणन ज्येष्ठ साहित्यीक, सकाळ समुहाचे माजी संचालक संपादक तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे लाभले आहेत.
महाराष्ट्रातून वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले शंभरहून अधिक मान्यवर प्रतिनिधी संमेलनात सहभागी होणार आहेत.
मॉरिशस गैबील कला, सांस्कृतिक विभाग मॉरिशस सरकार तसेच भोर मधील फुले, शाहु,आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि नागपूर येथील संथागार’ संस्थेच्या विद्यमाने फुले, शाहु, आंबेडकर साहित्य संमेलन मॉरिशस येथे होणार आहे.
Leave a Reply