प्रशासनानेच केला ८५ वर्षांच्या आजीचा अंत्यसंस्कार
प्रशासनानेच केला ८५ वर्षांच्या आजीचा अंत्यसंस्कार
सजग वेब टीम, जुन्नर
नारायणगाव (दि.११) | नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील धनगरवाडी या गावातील मनिषा कैलास शेळके यांचे सर्व कुटुंब (एकूण ९ रुग्ण) हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सर्व कुटुंबियांना लेण्याद्री कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यातच दुर्दैवाने शेळके यांच्या सासू लक्ष्मीबाई सखाराम शेळके वय ८५ वर्षे रा. धनगरवाडी ता. जुन्नर, जि. पुणे यांचा राहत्या घरी मृत्यू झाला.
प्राथमिक अंदाजानुसार त्या सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा संशय असून त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी कुणीही कौटुंबिक सदस्य नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनालाच पुढाकार घ्यावा लागला. नारायणगाव पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत धनगरवाडी व आरोग्य विभाग यांच्या वतीने आजींचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी सपोनि अर्जुन घोडे पाटील, नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी, आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ व आरोग्य विभागाचे कर्मचारी व सरपंच शेळके ताई, ग्रामपंचायत सदस्य महेश शेळके आदी उपस्थित होते.
रुग्ण आढळलेल्या ठिकाणी योग्य उपाय योजना करून सर्व परिसर निर्जंतुक करण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले आहे.
Leave a Reply