पुण्यात सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढले – डॉ. म्हैसेकर

पुण्यात सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढले

कोविड-19 ने मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब विकाराच्या ज्येष्ठांचे प्रमाण अधिक
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

सजग वेब टिम, पुणे

पुणे, दि.०९ 😐 पुणे शहरात कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या एकूण सॅम्पल पैकी साधारण ३.९ टक्के केसेस पोझिटिव्ह तर साधारण ८९ टक्के केसेस निगेटीव्ह आहेत. पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मृत पावलेल्या एकूण व्यक्तींपैकी साधारणपणे ८० टक्के व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहेत. शिवाय यातील बहुतांशी व्यक्तींना मधुमेह व उच्च रक्तदाब हा विकार दिसून आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

०५ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत ०१ हजार २३५ सॅम्पल घेण्यात आले होते. यापैकी ४८ सॅम्पल पॉझिटिव्ह तर १ हजार ११० सॅम्पल निगेटीव्ह आले आहेत. म्हणजे तपासणी करण्यात आलेल्या एकूण सॅम्पलपैकी साधारण ३.९ टक्के सॅम्पल पॉझीटीव्ह तर ८९ टक्के सॅम्पल निगेटीव्ह आले आहेत. मार्च महिन्याच्या तुलनेत १ एप्रिल ते ८ एप्रिल या दरम्यान साधारणपणे चार पट जास्त सॅम्पलची तपासणी करण्यात आली आहे. या कालावधीत पॉझीटीव्ह केसेसची संख्या ही झपाटयाने वाढल्याचे दिसून येते. तपासणी दरम्यान पॉझीटीव्ह केसेस जास्त आढळून आल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करु नये.

कोरोना पॉझीटीव्ह १ व्यक्ती सुमारे ४०० व्यक्तींना बाधित करु शकते. बाधित व्यक्तीने मास्क वापरला तर सुमारे २०० व्यक्ती बाधित होण्याइतके प्रमाण कमी होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा, असे आवाहन डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat