पुणे विभागात ४१ हजार ५४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी – विभागीय आयुक्त
पुणे विभागातील ४१ हजार ५४१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित ७० हजार ७०१ रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
सजग वेब टीम, पुणे
पुणे| पुणे विभागातील ४१ हजार ५४१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७० हजार ७०१ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण २७ हजार १३० आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण ०२ हजार ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८२४ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ५८.७६ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.८७ टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील ५८ हजार २७ बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित ३६ हजार २७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २० हजार ५४५ आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील १४ हजार ७४८, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ३ हजार ८१३ व पुणे कॅन्टोंन्मेंट २५७, खडकी विभागातील ४६, ग्रामीण क्षेत्रातील ०१ हजार ५८१, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील १०० रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण ०१ हजार ४५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील १ हजार ६१, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील २३६ व पुणे कॅन्टोंन्मेंट २९, खडकी विभागातील २७, ग्रामीण क्षेत्रातील ६८, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील ३४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच ५९३ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ६२.०९ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.५१ टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण ०४ हजार ७१२ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ०४ हजार १४, सातारा जिल्ह्यात ७६, सोलापूर जिल्ह्यात ३००, सांगली जिल्ह्यात ४० तर कोल्हापूर जिल्ह्यात २८२ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत २ हजार ६३० रुग्ण असून १ हजार ३२ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या १ हजार ५१० आहे. कोरोनाबाधित एकूण ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील ०६ हजार १२९ कोरोना बाधीत रुग्ण असून २ हजार ९७५ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २ हजार ७६९ आहे. कोरोना बाधित एकूण ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत १ हजार १०३ रुग्ण असून ४३९ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ६२७ आहे. कोरोना बाधित एकूण ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील २ हजार ८१२ कोरोना बाधीत रुग्ण असून १ हजार ६८ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ०१ हजार ६७९ आहे. कोरोना बाधित एकूण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यत विभागामध्ये एकुण ३ लाख ४९ हजार १७२ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी ३ लाख ४५ हजार २९५ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर ०३ हजार ८७७ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी २ लाख ७३ हजार ८४४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. तर ७० हजार ७०१ चा अहवाल पॉसिटिव्ह आहेत.
( टिप :- दि. २२ जुलै २०२० रोजी दुपारी ०३.०० वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
Leave a Reply