पुणे-नाशिक महामार्गावरील पाच बाह्यवळणांची कामे येत्या १५ दिवसांत सुरु होणार – नितीन गडकरी

सजग वेब टीम, पुणे

पुणे । खेड ते सिन्नर दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावरील पाच बाह्यवळणांची स्वतंत्र निविदा महामार्ग प्राधिकरणाने काढली आहे. ही कामे येत्या 15 दिवसांत ते महिनाभरात ही कामे सुरू होतील, अशी ग्वाही केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली

नवी दिल्ली येथे लोकसभेच्या सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेड-सिन्नर महामार्गावरील अपूर्ण राहिलेली कामे तसेच पुणे-शिरूर-नगर महामार्गाचे काम सुरू करण्यात यावे या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही कामे तात्काळ सुरू करावीत अशी मागणी केली. खासदार आढळराव पाटील म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 60 वरील रस्त्यांचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जुलै 2017 मध्ये झाले. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची चूक नसताना ठेकेदार कंपनीच्या चुकीमुळे कामे रखडली. शिवाय ठेकेदार कंपनीने न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे येथील बाह्यवळणाची कामे रखडली. आयएलएफएस ही कंपनी खेड-सिन्नर महामार्गाचे शिल्लक काम पूर्ण करण्यास असमर्थ आहे. याशिवाय पुणे-नगर रस्त्याची घोषणा होऊनदेखील या रस्ते कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही. महाराष्ट्र राज्यातील हे दोन रस्ते वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या विषयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप करून काम पूर्ण करण्याच्या ठेकेदाराला सूचना द्याव्यात अशी मागणी लोकसभेत केली.

यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की, आयएलएफएस कंपनी काम पूर्ण करू शकत नसल्याने खासदार आढळराव पाटील यांच्या आग्रहावरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने स्वत:च पैसे खर्च करून ही उर्वरीत कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कामाची निविदा प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली असून ठेकेदारांकडून निविदाही प्राप्त झाल्या आहेत. केवळ आयएलएफएसकडून ना हरकत प्रमाणपत्रयेणे बाकी आहे. त्यांच्याशी मी बोललो असून त्यांचे ना हरकत पत्र घेऊन येत्या 15 दिवसांत अथवा महिनाभरात हे काम सुरू होईल अशी खात्रीशीर ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. तसेच पुणे-नगर रस्त्याचा डीपीआर बनविण्याचे काम सुरू असल्याचेही यावेळी सांगितले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat