पुणे नाशिक महामार्गाच्या नारायणगाव अंतर्गत रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भातील बैठकीत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर


नारायणगांव  ।   पुणे नाशिक महामार्गाच्या नारायणगाव अंतर्गत रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भात आज प्रांत अधिकारी अजित देशमुख यांनी NHAI आणि ठेकेदार RSIPLया कंपनीच्या अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि काही ग्रामस्थांसमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत NHAI आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः शाळाच घेण्यात आली. रस्त्याचे काम चांगले होऊन सुद्धा नारायणगावमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार की नाही याबद्दल कोणीही शाश्वती दिली नाहीआणि ५ किमी च्या कामाला १७ कोटी खरच खर्च होणार आहे का? या मुद्द्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांना देता नाही आले.

नारायणगाव आणि वारूळवाडीतील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी यावेळी आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. तसेच कामाचा दर्जा हा महत्वाचा मुद्दा यावेळी चर्चिला गेला या मुद्द्यावरून अमित बेनके, नारायणगाव चे सरपंच बाबूभाऊ पाटे, वारूळवाडीचे लोकप्रतिनिधी जंगलभाऊ कोल्हे, संजय वारुळे आदींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat