पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार हवेत – शरद पवार
पिंपरी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भोसरी एमआयडीसी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. लोकसभेच्या निकालामुळे खचून न जाता विधानसभेच्या तयारीला लागा आणि पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदाससंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच आमदार निवडून आले पाहिजेत, असे आवाहन खा. शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
विधानसभा निवडणुकीला केवळ ९८ दिवस राहिले आहेत. जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्यासाठी आतापासूनच मतदारांशी संवाद साधा आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा. जेणेकरून मतदार ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न उपस्थित करणार नाही. असे केल्याने विधानसभा निवडणुकीत यश येणे अशक्य नाही, असा मार्गदर्शनपर सल्लाही पवार यांनी दिला.
Leave a Reply