Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2762

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/output.class.php on line 3706

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 751

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 795

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 831

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 839

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 893

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 917

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 955
पिंपरी-चिंचवडमधील १० हजार गरजू कुटुंबांना आता आमदार महेश लांडगेंचा 'आधार'! | Sajag Times

पिंपरी-चिंचवडमधील १० हजार गरजू कुटुंबांना आता आमदार महेश लांडगेंचा ‘आधार’!

पिंपरी-चिंचवडमधील १० हजार गरजू कुटुंबांना आता आमदार महेश लांडगेंचा ‘आधार’!

एक हात मदतीचा’उपक्रमांतर्गत शहरवासियांना आवाहन

सजग वेब टिम, भोसरी

भोसरी| कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने लॉकडाउन सुरू केले आहे. परिणामी, हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १० हजार गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करुन ‘आधार’ देण्याचा संकल्प केला आहे.

‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत पिंपरी- चिंचवडमधील नागरिकांनी आपआपल्या परिने गरजवंत नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. गरजवंत नागरिकांना तांदूळ, डाळी, तेल, गव्हाचे पीठ, मीठ-मसाले अशा स्वरुपात मदत करण्यात येणार आहे.

शहरात एकाच दिवशी (शनिवारी) नवीन सहाजण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे. चार वायसीए रुग्णालयातील आणि दोनजण खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मागील तीन दिवसांपासून पुन्हा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, आपण आतापर्यंत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष गरजू नागरिकांना मदत करीतच आहोत. पिंपरी- चिंचवडमधील नागरिकांच्या सहकार्याने आम्ही शहरातील १० हजार कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने आमची ‘टीम’कामाला लागली आहे. मात्र, नागरिकांनीसुद्धा सहकार्य केल्यास आम्हाला अधिकाधिक कुटुंबांना मदत देता येईल. त्यासाठी ‘पुन्हा एक हात मदती’चा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. कारण, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता. त्यावेळी आम्ही ‘एक हात मदतीचा’असे आवाहन केले होते. आता पुन्हा एक हात मदतीचा…अशी विनंती आम्ही नागरिकांना करीत आहोत. नागरिकांनी जीवनाश्यक वस्तू (फक्त किरणा) मदत म्हणून द्याव्यात.
मदत करण्यासाठी डॉ. निलेश लोंढे (मो. 9881572395), संजय पटनी (मो. 9822217163) आणि विनय रावळ (मो. 9689917031) यांची संपर्क साधावा, असे आवाहन आम्ही करीत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील महापुरातील मदतीची आठवण…
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात २०१९मध्ये महापूर आला होता. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांधिक मदत आमदार महेश लांडगे आणि शहर भाजपच्या पुढाकाराने करण्यात आली होती. ‘एक हात मदती’चा या उपक्रमांतर्गत केलेल्या मदतकार्याची प्रदेशपातळीवर दखल घेण्यात आली होती. त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूमधील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांनाही शक्य ती मदत करण्याची सकारात्मक भूमिका घेण्यात आली होती. आता कोरोनाविरुद्धच्या लढाईत पिंपरी-चिंचवड ‘पुन्हा एक हात एकदा मदतीचा’ देतील. त्याद्वारे आणि काही स्व:खर्चाने अशा स्वरुपात मदत उभी करुन पिंपरी-चिंचवडमधील मोलमजुरी करुन हातावर पोट असलेल्या सुमारे १० हजार गरजवंत कुटुंबांना मदत उभी करण्यात येणार आहे. ‘पुन्हा एक हात मदतीचा’चा सांगली, कोल्हापूरमध्ये केलेल्या मदत कार्याची आठवण पिंपरी- चिंचवडकरांना होणार आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat