पाहिजे ते मिळवण्यासाठी आयुष्यात बंड करता आले पाहिजे – आमदार सोनवणे
पाहिजे ते मिळवण्यासाठी आयुष्यात बंड करता आले पाहिजे – आमदार सोनवणे
-ज्ञानदीप पतसंस्था कार्यालय नवीन वास्तूत स्थलांतर कार्यक्रम
स्वप्नील ढवळे, जुन्नर (सजग वेब टीम)
नारायणगाव – ज्ञानदीप ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या कार्यालयाचे नवीन वास्तूत स्थलांतर समारंभ कार्यक्रमात बोलताना आमदार सोनवणे यांनी बोलताना ज्ञानदीप या पतसंसंस्थेची स्थापना हि बंडखोरी च्या भूमिकेतून झाली आहे. याचाच आधार घेऊन बोलताना सोनवणे यांनी आयुष्यात बंड करून जे पाहिजे ते मिळवता आले पाहिजे असे प्रतिपादन केले.
नारायणगाव चे सरपंच बाबूभाऊ पाटे यांनी ही संघर्ष केला व्यवस्थेविरुद्ध बंड करुन विजय मिळवला. तसेच मंगलदास बांदल यांनीही खासदार होण्यासाठी बंड केले आहे परंतु त्यांना संघर्ष करावा लागेल असा सल्ला ही बांदल यांना यावेळी बोलताना सोनवणे यांनी दिला. मी स्वतः देखील तालुक्यात १० वर्ष संघर्ष केला शिवसेनेने उमेदवारी नाही दिली म्हणून मनसे तुन बंड करत उमेदवारी जाहीर केली असे सोनवणे यावेळी बोलताना म्हणाले.
शिरूर लोकसभेचे इच्छुक उमेदवार मंगलदास बांदल यांनीही बोलताना संस्थेच्या वाटचालीचे कौतूक करत संस्थेला शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे माझंही बॅलन्सशीट चांगलं आहे जुन्नर च्या जनतेने त्याचाही विचार करावा असा संदेशही यावेळी जुन्नरकरांना दिला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक आवटे यांनी संस्थेच्या वाटचाली बद्दल तसेच स्थापनेबद्दल आणि त्यांनी संस्थेच्या उभारणी वेळी केलेल्या बंडाची आठवण यावेळी करून दिली.
या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती संजय काळे,नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे, विघ्नहर चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप कोल्हे तसेच जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार आणि संस्थेचे संचालक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Leave a Reply