पाण्याअभावी खामगाव भागातील पिके लागली जळू
सजग वेब टीम, जुन्नर
जुन्नर | जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई चे चित्र दिसत आहे. माणिकडोह धरण उशाला आणि कोरड खामगावकरांच्या घशाला अशी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचा जेमतेम पुरवठा आणि शेतीतील पाण्याअभावी होरपळणारी पिके अशा अवस्थेत सध्या मावळ भागातील लोक राहत आहेत.
शेतकऱ्यांच्या कृषी पंप पाण्याअभावी बंद आहेत. या सर्व परिस्थितीला प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असं शेतकरी म्हणत आहेत. काही भागात टँकर चालू करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी केली आहे. डिसेंबर जानेवारी पासूनच पूर्व भागातील गावांची पाण्यासाठी ओरड चालू झाली होती. त्यातच नियोजनापेक्षा अधिक पाणी कुकडी प्रकल्पातून सोडण्यात आल्याच्या बातम्याही येऊन गेल्या. त्यामुळे शेतकरी म्हणतात त्यात तथ्य असल्याचे जाणकारांचे मत आहे.
Leave a Reply