पाणी टंचाईवरून कांदळी ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
सजग वेब टीम
जुन्नर | जुन्नर तालुका आणि पंचक्रोशीत दुष्काळाच्या झळा सर्वत्र बसताना दिसत आहेत, शेतकऱ्यांपुढे पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच अनुशंगाने वडगाव कांदळी व परिसरातील ग्रामस्थ यांनी आज नारायणगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे धाव घेतली.या वेळी युवा नेते अतुल बेनके यांच्या समवेत अनेक ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य तसेच जेष्ठ्य नागरिकही उपस्थित होते.
शेतीला शेवटचे पाणी द्यायचे आहे परंतु कालवा समिती ची बैठक मात्र वारंवार पुढे ढकलली जात असल्याने पीक जळून जाण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.”आज २५ जण आलो आहोत उद्या पाण्यासाठी भांडायची वेळ पडली तर २५ हजार जण घेऊन पाटबंधारे विभागाचे कार्यालयावर मोर्चा आणू” अशा भावना ग्रामपंचायत सदस्या छाया गोपाळे यांनी व्यक्त केल्या. आमदार शरद सोनवणे यांच्याकडे पाणी प्रश्नावर दाद मागितली असता हे नियोजन माझ्या नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आहे असे उत्तर मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर सामान्य शेतकरी आमदारांकडे जाणार की थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मगणार असा सवाल संकेत बढे यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांनीही याप्रश्नी आवाज उठवला असून “वारंवार मागणी करूनही तालुक्यातील जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नसेल, तर मग आम्ही स्वतः जाऊन पाणी सोडू, पाण्याअभावी तडफडून मरण्या पेक्षा जेल मध्ये गुन्हा दाखल होऊन पडून राहणे जास्त योग्य वाटते” असे बेनके म्हणाले. पाणी प्रश्न हा तालुक्याचा आहे, यासाठी कुणी राजकारण न करता एकत्र येऊन लढा द्यायला हवा असेही ते म्हणाले. वडगाव कांदळी आणि परिसरातील लोकांना जर पाणी मिळालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.या वेळी अतुल बेनके,सूरज वाजगे,भावेश डोंगरे,योगेश घाडगे,सोमनाथ आप्पाजी रेपाळे, सुरेश महादु कुतळ,संकेत अशोक बढे,छायाताई शांताराम गोपाळे,संभाजी सिताराम घाडगे
,शांताराम दत्ताञय रेपाळे,दिपक गोविंद गोपाळे,विशाल सुदाम कुतळ,अशोक लहु बढे,सुभाष देवराम बढे,प्रल्हाद बबुशा कुतळ,बबन महादु कुतळ,मंगेश भरत रेपाळे,रामदास रखमा रेपाळे,पोपट शिवराम कुतळ,विकास सिताराम कुतळ,शैलेश राजाराम गुंजाळ
,महेंद्र दत्ताञय गुंजाळ,रत्नाकर जगताप,प्रविण वसंत बढे,सुभाष लहु बढे,सचिन सोपान बढे,गणेश सिताराम भालेराव,मंगेश दत्ताञय रोकडे,रामदास बाबुराव भालेराव,अनिल रानू घाडगे,अनिल राजाराम कुतळ,प्रकाश आप्पाजी घाडगे,मदन सदाशिव घाडगे
संदिप मारुती रेपाळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a Reply