पर्यटकांना नाणेघाट व किल्ले जीवधन वर्षा पर्यटनासाठी पुर्णपणे बंद

पर्यटकांना नाणेघाट व किल्ले जीवधन वर्षा पर्यटनासाठी पुर्णपणे बंद

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील घाटघर ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांनी जुन्नर तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता ऐतिहासिक नाणेघाट व किल्ले जीवधन वर्षा पर्यटनासाठी पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी गावातील तरुणांना बंदोबस्त करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. याबाबत जुन्नर पोलिस स्टेशनला पत्र देण्यात आले आहे.

जर आपण नाणेघाट किंवा किल्ले जीवधनला जात असाल तर नक्कीच जाणे टाळावे. अन्यथा याबाबत आपल्यावर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. ग्रामस्थांनी विनंती केली आहे की कृपया आपण घरीच थांबा व स्वत:ची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat