नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र(NUJM) च्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नितीन कांबळे

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र(NUJM) च्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नितीन कांबळे

 

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र ( NUJM )पुणे जिल्ह्याची जुन्नर तालुका कार्यकारिणी बैठक आज जुन्नर इथे आयोजित करण्यात आली होती. कोरोना काळात झालेल्या बैठकीत सोशल डिस्टनसिंग पाळत, मास्क व सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला.

युनियनच्या राज्याच्या अध्यक्ष शीतल करदेकर,पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन चपळगावकर यांच्या आदेशाने जिल्हा कार्याध्यक्ष-रायचंद शिंदे यांच्या उपस्थितीत आणि मावळते अध्यक्ष सचिन डेरे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर इथे वार्षिक सभा आणि नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली
NUJM च्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी – नितीन कांबळे, कार्याध्यक्षपदी- प्रा.विलास कडलाक,उपाध्यक्षपदी- प्रमोद पानसरे,सचिव-जयवंत शिरतर, सहसचिव- प्रा.रविंद पाटे,खजिनदार- सुधाकर सैद, समन्वयक पदी- प्रा.काशिनाथ आल्हाट व कायदे सल्लागार पदी – अँड. मारूती ढमढेरे यांची निवड करण्यात आली.

युनियनचे सदस्य पुढीलप्रमाणे:- प्रा.सचिन डेरे,आकाश डावखरे,अनिस सैय्यद,मनीषा औटी,अशोक कोरडे, विजय देशपांडे ,अशोक मस्करे,संजोग डुंबरे,सचिन भोर,आकाश गावडे,केदार बारोळे,स्मिता शिंदे.
—————–

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat