नारायणगाव सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा, जि. प. शाळांचा उत्स्फूर्त सहभाग
नारायणगाव | ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने परिसरातील सर्व जि.प.प्राथमिक शाळांचा संयुक्त “नारायणगाव सांस्कृतिक महोत्सव-२०१९” पूर्व वेस,नारायणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.एकूण नऊ जि.प.शाळांनी या महोत्सवात सहभाग घेतला. या महोत्सवामाध्येच नारायणगाव परिसरातील उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्व.साबीरभाई शेख ठिबक सिंचन अनुदान वाटपाचे लकी ड्रो कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती सरपंच श्री.योगेश बाबु पाटे व उपसरपंच संतोष दांगट यांनी दिली.
महोत्सवाचे उद्घाटन जुन्नर पंचायत सामितीचे गटविकास अधिकारी श्री.विकास दांगट आणि सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे,गटशिक्षण अधिकारी पी.एस.मेमाणे,पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर,बाळासाहेब पाटे,एकनाथ शेटे,सुजित खैरे,आशिष माळवदकर,डॉ.संदीप डोळे,शिवसेना शहर प्रमुख अनिल खैरे,उपसरपंच संतोष दांगट, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ,शिक्षक,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
‘चौदाव्या वित्त आयोगातून प्राथमिक शाळांच्या उन्नती,विकास कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व वित्तीय आराखड्यास पंचायत समिती जुन्नर कार्यालयाकडून परवानगी दिली जाईल तेसच ठिबक सिंचन योजनेला ग्रामपंचायत अनुदान इतकेच अनुदान पंचायत समिती जुन्नर मार्फत देण्यात येईल असे मनोगत गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी व्यक्त केले.
पंचायत समिती जुन्नरचे गटशिक्षण अधिकारी पी.एस.मेमाणे यांनी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या महोत्सवामुळे जि.प.प्राथमिक शाळांना सांस्कृतिक महोत्सवामुळे जि.प.प्राथमिक शाळांना सांस्कृतिक मंच उपलब्ध झाला असून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन व समाज यांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे सांगितले.
सरपंच योगेश पाटे यांनी परिसरातील सर्व जि.प.प्राथमिक शाळांचा विकास आराखडा पंचायत समिती जुन्नर सर्व अधिकारी,शिक्षक आणि समाजातील शिक्षण प्रेमी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने तयार करून गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक वातावरण ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून करण्यात येईल असे सांगितले.
या प्रसंगी यशवंती मेश्राम,संतोषनाना खैरे,यांचेही भाषण झाले.
सर्व सहभागी शाळा विद्यार्थीनी ग्रामपंचायतच्या वतीने स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले तसेच तसेच मान्यवरांच्या हस्ते साबीरभाई शेख ठिबक सिंचन योजने अंतर्गत जाहीर झालेला उस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
महोत्सवाकामी विशेष परिश्रम घेणाऱ्या सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान सरपंच योगेश पाटे व उपसरपंच संतोष दांगट यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव खैरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर औटी यांनी मानले.
Leave a Reply