नारायणगाव येथे संचारबंदीचा भंग करुन माॅर्निग वाॅक करणाऱ्या ४ जणांवर गुन्हे दाखल
नारायणगाव येथे संचारबंदीचा भंग करुन माॅर्निग वाॅक करणाऱ्या ४ जणांवर गुन्हे दाखल
सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव । नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दी मध्ये सकाळी ६ च्या सुमारास संचारबंदी अनुशंघाने स.पो.नि.घोडे पाटील, पो.हवा कोकणे, पो.कॉ गारगोटे, पो.कॉ.सांळूखे हे नारायणगावामध्ये पेट्रोलींग करित असताना राजेंद्र अशोक भिसे (रा येडगाव,ता जुन्नर, जि पुणे), महेश रामदास वाणी (रा.हनुमान चौक, ता जुन्नर जि. पुणे), प्रणव उत्तम दोंदे (रा खोडद रोड नारायणगाव, ता. जुन्नर जि पुणे), विवेक बाजीराव मानव (रा.नारायणगाव ता जुन्नर जि पुणे) हे संचार बंदीचा आदेश झुगारून विनाकारण फिरताना मिळुन आल्याने त्यांना बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता मॉर्निग वॉकला आलोय, सहज फिरतोय, असेच आलोय अशी उत्तरे दिली.
सदर कृती संचार बंदीचा आदेश झुगारून या व्यक्ती विनाकारण फिरताना मिळून आल्याने त्याचे विरूध्द भा.द.वि.कलम १८८ प्रमाणे पो.कॉ.योगेश गारगोटे यांनी फिर्याद दिली असून संबंधीत इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.फौ.ढमाले, पो.ना.कोबल हे करत आहे.
नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, अत्यावश्यक वस्तुची खरेदी करण्यासाठी फक्त एक इसमाने बाहेर पडावे, अत्यावश्यक सेवा बाबत फोन करून घरपोच सेवा उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे न केल्यास कायदेशिर कारवाई होवून गुन्हे दाखल करण्यात येतील असे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले.
Leave a Reply