नारायणगाव येथे एमपीएससी – युपीएससी अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न
नारायणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना होणार अभ्यासिकेचा फायदा
सजग वेब टिम, नारायणगाव
नारायणगाव| ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातुन श्री. छत्रपती शिवाजी सार्वजनिक वाचनालय येथे सुरु करण्यात अालेल्या MPSC – UPSC अभ्यासिकेचे उद्घाटन नोबेल पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्रसिंह राणा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यासिकेचा फायदा स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना होणार असून अभ्यासिका सुरु केल्याबद्दल नागरिकांनी ग्रामपंचायतचे कौतुक केले आहे.
यावेळी गटविकास अधिकारी विकास दांगट, सरपंच योगेश पाटे, मनिषा मेहेत्रे, संतोष दांगट, बाळासाहेब पाटे, आरिफ आतार, राजेश बाप्ते, भागेश्वर डेरे, डाॅ.संदिप डोळे, नितीन नाईकडे यांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply