नारायणगाव येथील बांधकाम व्यावसायिक शुभम बडेरा व सुनिल वाव्हळ यांच्यावर गुन्हा दाखल

नारायणगाव येथील बांधकाम व्यावसायिक शुभम बडेरा व सुनिल वाव्हळ यांच्यावर गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी यांचे कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांची माहिती

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | नारायणगाव गावच्या हद्दीतील नारायणगाव बाजार पेठमध्ये अभिनंदन कलेक्शन समोरील भन्साळी यांचे बांधकामाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी पुणे यांचे कोरोना सुरक्षेविषयक नियमांचे उल्लंघन करुन बांधकामाच्या ठिकाणी गर्दी जमवले प्रकरणी नारायणगाव येथील बांधकाम व्यावसायिक शुभम सुनिल बडेरा व सुनिल बिंबाजी वाव्हळ यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम १८८, २६९, २७०, कोविड -१९ उपाय योजना २०२० नियम ११ प्रमाणे २, ३, ४ आपत्ती व्यवस्थापन २००५ कलम ५१(२) नुसार गुन्हा र.नं.१८७/२०२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत पातळीवर कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असुन आता ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणे करिता उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयीन आदेशानुसार जिल्हा कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमू नयेत व अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व स्थापना कार्यरत ठेवू नये याबाबतचा आदेश जारी करण्यात आलेला आहे.

परंतु आज दि.७ जुलै रोजी ११:३० च्या सुमारास नारायणगाव बाजारपेठ येथे सपोनि अर्जुन घोडे पाटील, पो.काँ साळुंखे व पो.काॅ. सचिन कोबल पेट्रोलिंग करीत असताना वर नमूद केलेले इसम नारायणगाव बाजार पेठ येथील अभिनंदन कलेक्शन समोरील बनसोडे यांचे इमारतीचे बांधकाम चालू ठेवून त्यामध्ये बांधकाम करणारे कामगारांची गर्दी जमवून इमारतीचे बांधकामाचे काम करीत असताना मिळून आला म्हणून त्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवमान्यता केली वगैरे मजकूर चे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पो.काॅ.सचिन कोबल यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत सहाय्यक फौजदार एस.जे.केंगले यांनी गुन्हा दाखल केला असुन सहाय्यक फौजदार के.डी.ढमाले हे तपास करत आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat