नारायणगाव महाविद्यालयात लोकसंख्या वाढ विषयावर जनजागृती कार्यक्रम
सजग वेब टिम, जुन्नर (अशफाक पटेल)
नारायणगांव | ग्रामोन्नती मंडळाच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. शिरीष पिंगळे यांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले.
त्यात त्यांनी ध्वनिप्रदूषण कसे निर्माण होते, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम या बद्दलची माहिती सांगितली. त्यांनतर उपप्राचार्य डॉ. जी. बी. होले सरांनी लोकसंख्या नियंत्रण जनजाग्रुती यांवर मार्गदर्शन त्यात त्यांनी लोकसंख्या वाढीमुळे होणारे परिणाम याबद्दल सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट प्रतीक ढवळे याने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. सी. सी विभागप्रमुख डॉ. दिलीप शिवणे सरांनी केले.व प्रमुख पाहुण्यांची ओळख कॅडेट लक्ष्मी बोंबे हिने करून दिली. कार्यक्रमाला उपस्थित डॉ. टाकळकर सर, डॉ. कसबे सर आणि डॉ. पठारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व एस. यू. ओ. विवेक वायकर याची एन .सी. सी. विदयार्थी प्रतिनिधी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे आभार कॅडेट शिवानी चव्हाण हिने मानले. त्यांनतर छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी लोकसंख्या जनजागृतीसाठी रॅली, कार्यशाळा, व पथ नाटकांचे सादरीकरण व तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमास एन सी सी चे १०० कडेटस उपस्थित होते आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला.या सर्व कार्यक्रमामध्ये ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे,कार्याध्यक्ष अनिल मेहेर,कार्यवाह रवींद्र पारगावकरआणि इतर सर्व मंडळींचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply