नारायणगाव पोलिस स्टेशन, पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल यांचे आरोग्य शिबिर संपन्न
नारायणगांव | आज दिनांक ५ जून २०१९ रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन, रोटरी क्लब नारायणगाव हायवे व ओम चैतन्य हॉस्पिटल आळेफाटा, यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल यांचा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास ७० ते ७५ लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ४० लोकांच्या लेटेस्ट केल्या व १६ लोकांच्या ईसीजी तपासणी केली
४५ लोकांची नेत्ररोग तपासणी केली. डॉक्टर गजानन देशमुख आर्थोपेडिक सर्जन, डॉक्टर गणेश आवटी जनरल प्रॅक्टिस, डॉक्टर झोपे नेत्ररोग तज्ञ यांच्यामार्फत तपासणी केली
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५० झाडांची (केशरआंबा, वड) लागवड पोलीस स्टेशन ग्राउंड मध्ये करण्यात आली त्यासाठी रा प सबनीस कृषी विज्ञान केंद्रातील टेमकर सर व त्यांच्या टीमने वृक्ष लागवडीची माहीती मार्गदर्शन केले
परिसर स्वच्छता करण्यात आली
या कार्यक्रमास एपीआय अर्जुन घोडे पाटील , पी.एस.आय. मोरे पीएसआय चौधरी, रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे अध्यक्ष रो.शामराव (अण्णा)थोरात
उपाध्यक्ष रो बाळासाहेब गिलबिले सर ,
माजी अध्यक्ष महेश बोराणा, प्रा. डॉक्टर पंजाबराव कथे, माजी पोलिस अधिकारी सुकाजी मुळे, प्रा. डॉक्टर रो.काळे सर विवेक येलुरकर पत्रकार रो. अतुल कांकरिया, रो. शिवाजी कुमकर सर, प्रा. डॉक्टर शिवाजी टाकळकर सर, ॲड रो.राम भालेराव , पूजा कम्प्युटर गंगणे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते
बाळासाहेब ढोरे पब्लिक रिलेशन ऑफिसर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सूत्रसंचालन गिलबिले सर यांनी केले
Leave a Reply