नारायणगाव परिसरात नारायणगाव पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नारायणगाव परिसरात नारायणगाव पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांना पोलिसांचा चोप

सजग वेब टिम,  जुन्नर

नारायणगांव | प्रांताधिकारी जितेंद्र दुडी, तहसिलदार हनुमंत कोळेकर यांच्याकडुन उत्कृष्ट नियोजनाबद्दल लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व सपोनि अर्जुन घोडे पाटील यांचे कौतुक

लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्याकडुन विविध सुविधांच्या संदर्भात नागरिकांना आवाहन

Anc नारायणगाव वारुळवाडी परिसरात ग्रामपंचायत नारायणगाव, ग्रामपंचायत वारुळवाडी, पोलिस स्टेशन नारायणगाव यांच्या माध्यमातुन संचारबंदी संदर्भात योग्य नियोजन करुन लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत.

तसेच पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव पोलिस स्टेशनच्या माध्यमातुन कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलिस उपनिरिक्षक अभिजित पवार यांसह पोलिसांनी स्वत: हातात काठी घेऊन चोप दिला.

यानिमित्तानं प्रांताधिकारी जितेंद्र डुडी, तहसिलदार हनुमंत कोळेकर, नायब तहसिलदार सचिन मुंढे यांसह अधिकार्‍यांनी नारायणगाव परिसरात पाहणी करुन नारायणगाव परिसरात ग्रामपंचायत नारायणगाव व पोलिस स्टेशन नारायणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या बंदच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या संपुर्ण टीमचे कौतुक केले.

तसेच आज सरपंच योगेश पाटे यांच्या वाढदिवसानिमित्त सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी मास्क व सॅनिटायझर भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat