नारायणगाव येथे जुगार आणि मटका अड्डयांवर पोलिसांचा छापा
नारायणगाव येथे जुगार आणि मटका अड्डयांवर पोलिसांचा छापा
नारायणगाव | उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पो. स. ई. मोरे, स. फौ. गेगजे, पो. काँ. दिनेश साबळे, अरगडे, वाघमारे यांनी मच्छी मार्केट तसेच वाजगे आळी येथे कल्याण नावाचा मटका खेळत असणाऱ्या इसमांवर छापा टाकून कारवाई केली. वाजगे आळी येथील छाप्यात ४४२० रु. आणि मच्छीमार्केट येथील छाप्यात २५२० रु. किंमती ची रोख रक्कम आणि जुगार खेळण्या चे साहित्य मिळाले आहे. त्यामध्ये कॉन्स्टेबल दिनेश साबळे आणि कॉन्स्टेबल अरगडे यांनी फिर्याद दिली असून सदर प्रकरणी संदेश खंडागळे, नासीर फकीरमहम्मद, अशोक भिमराव रणदिवे, किसन रघु गायकवाड, मारुती गोविंद शेलार या इसमां विरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशन तर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Leave a Reply