नारायणगाव ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न
नारायणगाव | नारायणगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी मधून वार्ड क्रमांक ४ मधील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याची माहिती सरपंच श्री.योगेश पाटे व ग्रामविकास अधिकारी नाईकडे यांनी दिली.
आज मंगळवार दि.१५/०१/२०१९ मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर नारायणगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधून वार्ड क्र.४ मध्ये हवेली आळी (खैरे आळी)येथील सुलभ शौचालाय युनिट,श्री स्वामी समर्थ मंदिर पाटे आळी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे,दळवी-मुंडलिक बोळ पाटे आळी पेव्हर ब्लॉक बसविणे,छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय (खैरे आळी)पेव्हर ब्लॉक बसविणे,कोऱ्हाळे,वाळके,तांबोळी,भराडीया (जुन्नर रोड) पेव्हर ब्लॉक बसविणे इत्यादी विकास कामांचा लोकार्पण सोहळा नारायणगावचे लोकनियुक सरपंच श्री.योगेश उर्फ बाबुभाऊ पाटे यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला.
यावेळी नारायणगावचे उपसरपंच संतोष दांगट, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य राजेश बाप्ते, विजय वाव्हळ, सुप्रिया खैरे, आरिफ आतार, रामदास अभंग, कुसुम शिरसाठ, रुपाली जाधव, गणेश पाटे, श्री विरोबा परिवाराचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब पाटे,अरविंद लंबे,अशोक गांधी,देविदास ताजवे,अनिल खैरे,हेमंत कोल्हे, वासुदेव कानसकर, संजय देशमुख, मदन टेंभेकर, विवेकानंद नेवकर, मयूर विटे,भाई धावडे,भाग्येश्वर डेरे, शंकर जाधव,असलम तांबोळी,दीपक पांचाळ,संजय कसाबे,डॉ.रविंद्र गिरी,निलेश दळवी,सोपान जाधव,अक्षय किठे,बबन पानसरे,मंदार पाटे,विजय भोंग,शांतीलाल पटेल,पांडुरंग गडदे,दशरथ पाटे,तेजस गोरडे,पप्पू भूमकर, विवेकानंद धावडे,अक्षय वाव्हळ,पवन वाव्हळ,आनंद पोखरणा,सुदीप कसाबे, सचिन पवार, पत्रकार स्वप्निल ढवळे, अरविंद ब्रम्हे ,अजीम शेख,बी.एस.मांडे,रमेश पाटे इत्यादी मान्यवर व वार्डामधील स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अशोक गांधी ग्रामपंचायतिच्या कामांचे कौतुक केले प्रास्ताविक ज्ञानेश्वर औटी केले तर आभार राजेश भैय्या बाप्ते यांनी मानले.
Leave a Reply