नारायणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सारिका डेरे यांची बिनविरोध निवड
नारायणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सारिका डेरे यांची बिनविरोध निवड
सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव | ग्रामपंचायत नारायणगावच्या उपसरपंचपदी सारिका भागेश्वर डेरे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी दिली.
उपसरपंच मनिषाताई मेहेत्रे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने आज ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाची निवड प्रक्रीया संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते सरपंच योगेश पाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटिंगमध्ये वार्ड क्रमांक ३ च्या सदस्या सारिका डेरे यांची उपसरपंच पदावर निवड करण्यात आली.
यावेळी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, नवनियुक्त उपसरपंच सारिका डेरे, सदस्य संतोष दांगट, मनिषा मेहेत्रे, आरिफ आतार, राजेश बाप्ते, गणेश पाटे, रामदास अभंग, पुष्पा आहेर, ज्योती दिवटे, रुपाली जाधव, अनिता कसाबे, अश्विनी ताजणे, कुसुम शिरसाठ, संगिता खैरे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे उपस्थित होते.
यानिमित्तानं बाळासाहेब पाटे, जि.प.सदस्या आशाताई बुचके, पं.स.सदस्य अर्चनाताई माळवदकर, संतोषनाना खेैरे, एकनाथ शेटे, सुजित खैरे, अशोक गांधी, अशोक पाटे, आशिष माळवदकर, ज्ञानेश्वर अौटी, निलेश दळवी, मयुर विटे, मनोहर वाघ, अजित वाजगे, भागेश्वर डेरे, यांसह विविध पदाधिकारी, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply