नारायणगावच्या ग्रामसुरक्षा निधीला उद्योजक राजेश जाधव यांच्याकडून ५० हजारांची मदत
नारायणगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसुरक्षा निधीला उद्योजक राजेश जाधव यांच्याकडून ५० हजारांची मदत
नारायणगावचे ग्रामस्थ नसून देखील भरघोस मदत केल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी मानले आभार
सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव । ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून नारायणगावच्या सामाजिक उपक्रम व संरक्षण उपाययोजनांसाठी लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांनी नागरिकांना “ग्रामसुरक्षा निधीला” मदत करण्याचे आवाहन केले असुन या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत अाहे.
यानिमित्ताने सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांच्या उपाययोजना व कौतुकास्पद काम पाहुन रज्जाक काझी व मंदार पाटे यांचे जवळचे मित्र पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रचना कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजेश फकिरा जाधव यांनी ५०,००० रुपयांची भरघोस मदत करत हातभार लावला. नारायणगावचे ग्रामस्थ किंवा रहिवाशी नसून देखील एक सामाजिक जबाबदारी म्हणुन मदतीचा हात पुढे केल्याबद्दल सरपंच पाटे यांनी फोनवर संपर्क साधत राजेश जाधव यांचे आभार मानले.
ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे कोरोना पासुन गावाचे संरक्षण व्हावे यासाठी गावाती सर्व भागात हायपोक्लोराईट फवारणी, धुराची फवारणी, तमाशा कलावंतांना अन्नधान्य मदत, गरजु निराधारांना जेवन, मोहल्ला क्लिनिक संकल्पनेतुन मोफत आरोग्य तपासणी व अौषध वाटप, अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे उत्कृष्ट नियोजन, नारायणगाव पोलिसांकडून संचारबंदी कडेकोट अंमलबजावणी यांसह विविध उपाययोजना राबवत असून यामुळे कोरोना सुरक्षेच्या नारायणगाव पॅटर्नचे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून कौतुक होते.
त्यामुळे नारायणगाव सुरक्षेसाठी व विविध सामाजिक उपाययोजनांसाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधून ग्रामपंचायतच्या खात्यावर मदत करुन हातभार लावाला असे आवाहन लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांच्याकडून करण्यात आले आहे.
Leave a Reply