नारायणगावचे विशाल दिलीप भुजबळ यांचा “राष्ट्रीय युथ आयकॉन 2020 पुरस्कार” ने सन्मान
नारायणगावचे विशाल दिलीप भुजबळ यांचा “राष्ट्रीय युथ आयकॉन 2020 पुरस्कार” ने सन्मान
केंद्रीय मानव संसाधन व सूचना, प्रसारण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
सजग वेब टीम
नवी दिल्ली । नवी दिल्ली येथे कार्यरत असलेले पुणे जिल्ह्यातील नारायणगांंवचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रनिर्माण युवक संघाचे सर्वेसर्वा विशाल दिलीप भुजबळ यांना राष्ट्रीय युथ फेडरेशनचा नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा “राष्ट्रीय युथ आयकॉन” हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला वाय.एम.सी.ए. ऑडिटेरियम नवी दिल्ली येथे केंद्रीय मानव संसाधन व सूचना, प्रसारण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विशाल भुजबळ हे गेली 10 वर्षे सामजिक क्षेत्रात पुर्णवेळ कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात दैनंदीन हे अग्रेसर असतात. सामाजिक क्षेत्रात आयोजित विविध सामाजिक उपक्रम राबविणे या सोबतच दिन दुबळ्या जनतेची सेवा करणे , प्रत्येक मासिक सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग हा उत्साहवर्धक राहिलेला आहे. सर्वजण त्यांना ‘समाज दूत’ या नावाने ओळखतात. त्यांनी शैक्षणिक, सहकार, कृषि व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे.
एकत्र सामजिक कुटुंब पद्धतीचा आदर्श भुजबळ यांनी समाजासमोर ठेवला असुन काही दिवसांपुर्वी त्यांनी “समाज दिनबंधु” कार्याची सुरुवात केलेली आहे. त्यांच्या या सर्वांगिण बाबींचा, कार्याचा विचार करून राष्ट्रीय युथ फेडरेशन, नवी दिल्ली यांनी त्यांना यावर्षीचा ‘राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्कार 2020′ पुरस्कराने सन्मानित केले आले. विशाल भुजबळ यांचे वरील सन्मानार्थ समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Leave a Reply