नारायणगावकरांकडून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप

नारायणगावकरांकडून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव | काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर-सांगली या भागात महापूरामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली. याभागातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेचं गांभीर्य ओळखून सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांनी पुढाकार घेतला आणि नारायणगावकरांच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये जाऊन जीवनावश्यक गोष्टी पुरवल्या होत्या.

राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान, नारायणगावच्या माध्यमातून आपल्या युवा सहकारी मित्रांना घेऊन शिरोळ तालुक्यातील बस्तवाड येथे चार दिवस मुक्कामी राहून तेथील ग्रामस्थांना मदतीचा हात देऊन तेथे साफसफाई, मोडतोड झालेल्या घरांची दुरुस्ती, आजारी ग्रामस्थांना औषधे वाटप, सलग चार दिवस ग्रामस्थांना जेवणाची सोय केली.

या चार दिवसांच्या दरम्यान सरपंचांनी बस्तवाड गावातील विद्यार्थ्यांना शब्द दिला होता की तुमच्यासाठी शाळेचा गणवेश घेऊन पुढच्या वेळेस नक्की येईन. विद्यार्थ्यांना दिलेल्या या आश्वासनाची पूर्ती आज बस्तवाड या गावी जाऊन तेथील मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि क्रीडा गणवेश सुमारे १८७ विद्यार्थ्यांना देऊन करण्यात आली. याप्रसंगी तेथील ग्रामस्थांनी सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat