दुष्काळात जगवलेल्या मिरचीचे अज्ञात व्यक्तीकडून नुकसान

सजग वेब टिम, जुन्नर (सुधाकर सैद)
बेल्हे | उंचखडक येथील एका शेतकऱ्याच्या मिरचीची सुमारे पाचशे झाडे  कोणीतरी अज्ञात व्यक्तीने उपटुन टाकल्याची घटना घडली.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार उंचखडक (ता.जुन्नर) येथील ज्ञानदेव यशवंत कणसे यांनी त्यांच्या शेतात सुमारे सातशे मिरचीची रोपे लावली होती. नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळी मिरच्यांना पाणी देण्यासाठी आपल्या शेताकडे गेले असता त्यांना शेतात असलेल्या सातशे झाडांपैकी पाचशे झाडे  कोणीतरी उपटुन टाकल्याचे दिसले.सध्या चालु असलेल्या बाजारभावानुसार या शेतक-याचे एक लाखाहुन अधिक नुकसान झालेले आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच शेतक-याचा याच शेतामध्ये भुईमूगाचे पिक होते,ते पिक अज्ञात व्यक्तींनी एका रात्रीत उपटुन भुईमूगाच्या शेंगा तोडुन नेल्या होत्या तेव्हा देखील या शेतक-याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते! त्यावेळीही या शेतकऱ्यांने पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरूध्द तक्रार दाखल केली होती व आज पुन्हा हि घटना या ठिकाणी घडली आहे.
या शेतकऱ्याने टँकरने पाणी विकत आणुन हे पिक कसे तरी जगवले होते आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची ही दुसरी वेळ असून सदर शेतक-याला मोठया प्रमाणात नुकसानीची झळ पोहोचली असून ज्या कोणी व्यक्तींनी ही मिरचीची झाडे उपटुन टाकली आहेत त्यांचा शोध घेऊन पोलीसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat