Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2762

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/output.class.php on line 3706

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 751

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 795

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 831

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 839

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 893

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 917

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 955
"दिल्या घरी सुखी राहा" निकमांचा गिरेंना टोला | Sajag Times

“दिल्या घरी सुखी राहा” निकमांचा गिरेंना टोला

 

सजग वेब टीम, आंबेगाव

मंचर | ” शिरूर लोकसभा मतदार संघात २०१४ मध्ये मोदी लाटेमुळे मला यश आले नाही. मात्र त्यावेळी आमच्यात राहून विरोधकांना मदत करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन तालुकाध्यक्ष अरुण गिरे यांनी केले. त्यांनी सूर्याजी पिसाळ यांनाही लाजवेल असा दगाफटका केला.” असा पलटवार शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रचार प्रमुख व मंचर बाजारसमितीचे सभापती देवदत्त निकम यांनी केला आहे.

घासून नव्हे तर अगदी ठासून १८ हजार मतांचा दगाफटका गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी दिल्यामुळेच निकम पराभूत झाल्याची कबुली निकम यांनी दिली. असा आरोप गिरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता.

या आरोपाला सडेतोड उत्तर देताना देवदत्त निकम म्हणाले, ” राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मला लोकसभेची उमेदवारी दिली. निवडून आणण्यासाठी वळसे पाटील यांनी जीवाचे रान केले. पण मोदी लाटेमुळे माझा पराभव झाला. माझ्या सारख्या शेतकरी कुटुंबातील तरुणाला भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्ष पदावर दोन वेळा व बाजारसमितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी वळसे पाटील यांनी दिली आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला संधी देण्याचे धोरण वळसे पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आहे.”

गिरे हे एका गॅरेज मध्ये काम करत होते. त्यांना विद्यार्थी काँग्रेसचा युवक अध्यक्ष करण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. त्यानंतर त्यांना निवडून आणून पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी वळसे पाटील यांनी दिली. त्यावेळी शिक्षकांच्या बदल्याचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. शिवसेनेच्या एका महिला सदस्याने गिरे यांना जिल्हा परिषद सभागृहात झोडपून काढल्याचे सर्वश्रुत आहे. जून २०१४ मध्ये मंचर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आपणच बोलला होता की, मी पक्ष बदलला तर मला फाशी द्या. हे आपले फेकू वाक्‍य जनता विसरलेली नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत गिरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष होते. सदसदविवेक बुद्धीला स्मरून त्यांनी सांगावे की, तुम्ही माझे मनापासून काम केले की विरोधात काम केले ? हे संपूर्ण जनतेला ठाऊक आहे. तुम्ही विरोधी काम करूनही व कमी कालावधी मिळूनही या मतदार संघातील जनतेने चांगले मताधिक्‍य दिले. याच मतदारसंघात तुम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने व पक्षनेतृत्वाने एवढी मोठी पदे देऊनही आपण पक्षाशी व पक्ष नेतृत्वाशी बेइमानी करून शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिलात, तेव्हा ह्याच जनतेने आपल्याला थोडेथोडके नव्हे तर तब्बल ५८ हजारांच्या फरकाने उचलून टाकले आहे. स्वतःच्या मेंगडेवाडीतही बहुमत मिळाले नाही. यावरून आपली आपल्या गावातील लोकप्रियता समजून येते. नेतृत्वाशी बेईनामी करणे हे आमचे पिंड नाही. आमचे एवढेच सांगणे आहे की, ‘दिल्या घरी सुखी रहा’.

केंद्र व राज्य पातळीवरील विविध कामे, प्रकल्प याचे निर्णय कोण घेते. हे आपले अज्ञान आहे. त्यामुळे विमानतळ , रेल्वे, महामार्ग ह्या प्रश्नावर कोणाला जबाबदार धरावे? याचेही ही आपल्याला भान राहत नाही, त्यामुळे अर्थहीन प्रश्न उपस्थित करून जनतेची दिशाभूल करणे थांबवा. ह्या प्रश्नांबाबत निवडणूक प्रचारात मी “लावरे तो व्हिडीओ” हे आपण पाहिले नसेल तर जरूर पाहून घ्या.

पराग साखर कारखान्याची उभारणी ही शिरूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार करण्यात आली आहे. पराग मुळे रोजगार निर्मिती झाली आहे. पराग कारखाना यावर्षी नसता तर शिरूर तालुक्‍यातील पाण्याअभावी जळणाऱ्या उसाचे काय झाले असते ? हे तेथील शेतकऱ्यांकडून जाणून घ्या. भीमाशंकर च्या बाबतीत तुम्ही चिंता करण्याचे अजिबात कारण नाही, जनतेने निवडून दिलेले लोकनियुक्त संचालक मंडळ सक्षम आहे व ते चांगले काम करत आहे.

२३ तारखेला आढळराव पाटील यांचे काय होणार याचा अंदाज आला आहे. आढळराव हे विधानसभेला उभे राहतील. त्यानंतर आपले भवितव्य काय आहे ? असा प्रश्न गिरे यांना भेडसावू लागल्याने आपले अपयश झाकण्यासाठी इतरांवर बिनबुडाचे आरोप ते करत आहेत. विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीची तुम्ही चिंता करण्यापेक्षा शिवसेनेचा उमेदवार कोण असेल व त्यात आपला नंबर कुठे आहे. याचे आत्मचिंतन करावे. असा सल्लाही गिरे यांना निकम यांनी दिला आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat